बेस्टच्या अतिरिक्त २९१ बस रस्त्यावर

बेस्टच्या अतिरिक्त २९१ बस रस्त्यावर

मुंबई, ता. २२ : गेल्या १५ दिवसांत बेस्टच्या कंत्राटदारांकडून चालवण्यात येणाऱ्या तीन एसी बसना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी बेस्ट प्रशासनाने मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणारी सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ४०० सीएनजी बस थांबवण्यात आल्याने आज दिवसभर गाड्यांचा तुटवडा जाणवला. तुटवडा भरून काढण्यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यातील २९१ बस आज रस्त्यावर उतरवल्या. मात्र, वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची तासन् तास फरफट झाली.

बेस्टने मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणारी सेवा थांबवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ आणि मरोळ बस आगारांवर झाला. चारही आगारांतून होणारी बस सेवा पूर्णपणे कोलमडली. परिणामी सकाळपासूनच आगारांसह बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि आगार नियंत्रक यांच्यामध्ये वादावादीही झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने आज सकाळपासून त्यांच्या इतर ताफ्यातील २९१ बस विविध बसमार्गांवर आवश्यकतेनुसार चालवल्या. त्यामुळे वेगवेगळ्या बसमार्गांवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, तरीही बसचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसले. प्रवाशांना आपली आवश्यक बसची वाट बघत ताटकळत राहावे लागले.

सुरक्षेबाबत तडजोड नाही!
मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या बसना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी कंत्राटदार व बस निर्मात्यांनी आवश्यक बदल आणि योग्य उपाययोजना करीपर्यंत तसेच भविष्यात अशा घटना न होण्याची खबरदारी घेईपर्यंत बेस्ट उपक्रमाने सर्व ४०० बसगाड्या प्रवर्तित न करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. बसच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करावे लागतील. त्यासाठी प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही बेस्ट प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com