अवॉर्डपेक्षा रिवॉर्ड महत्त्वाचे : डॉ. उत्कर्ष शिंदे

अवॉर्डपेक्षा रिवॉर्ड महत्त्वाचे : डॉ. उत्कर्ष शिंदे

मुंबई, ता. २३ : काम कोणतेही असो, त्याकडे काम म्हणून बघू नका; मग ते कंटाळवाणे वाटते. आयुष्यात जे करायचे आहे ते मनापासून करा, जगणे म्हणून स्वीकारा. त्यातून जीवन जगण्याचा तुम्हाला आनंद मिळेल. अवॉर्डपेक्षा रिवॉर्ड महत्त्वाचे असते. आपण कलाकार म्हणून प्रेक्षकांची मने जिंकायला हवीत. त्यातूनच तुम्हाला खरा आनंद मिळेल, असा विश्वास गायक, अभिनेते डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी व्यक्त केला. यिन मिनिस्ट्रीच्या अधिवेशनात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर संयम महत्त्वाचा आहे. माझे आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे यांनी उत्कृष्ट काम केले. त्या वेळी त्याची दखल फारशी कुणी घेतली नाही. त्यामुळे त्यांना अवॉर्डही मिळाली नाहीत; पण त्यांनी संयम ठेवला. आज माझ्या घरात सर्व अवॉर्ड आहेत. कला ही कला असते. त्यात हिंदी-मराठी असा भेद करणे योग्य नाही. मराठी माणसे मराठीकडे पाठ फिरवून आपण स्वतःच आपले महत्त्व कमी करत आहोत. आपण ठरवायला हवे की आपल्याला काय बघायचे आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. त्यांना अवॉर्ड मिळतात; पण आपण बघायला जात नाही. मराठी चित्रपट वाचवायचे असतील, तर आपल्याला चित्रपट बघायला हवेत.
शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हा संगीताचा पाया आहे. इतर कोणतेही संगीत आले तरी ते टिकणारच आहे. लोकांना ते आवडत आहे; पण प्रत्येक क्षेत्रात नावीन्य जपणे महत्त्वाचे आहे. नक्कल करणारा कधीही पुढे जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com