रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या नफ्यात वाढ

रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या नफ्यात वाढ

मुंबई, ता. २६ : जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील देशातील पाचवी मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या व्यवसायात मागील वर्षाच्या शेवटच्या नऊ महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपनीने सलग आठ वर्षे चांगली व्यवसायवाढ नोंदविली आहे.

गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत कंपनीला आठ हजार २०८ कोटी रुपये प्रीमिअमचे उत्पन्न मिळाले. हे त्याआधीच्या वर्षाच्या त्याच कालावधीपेक्षा ९१४ कोटींनी जास्त आहे. या नऊ महिन्यांमध्ये त्यांना ३३४ कोटी रुपये करपूर्व नफा (आधीच्या वर्षातील नऊ महिन्यांमध्ये ३१४ कोटी रु.) मिळाला. कंपनीच्या मालमत्ता व गुंतवणुका मागील नऊमाहीपेक्षा या नऊमाहीत २० टक्के वाढल्या. मागील नऊमाहीत त्यांचे मूल्य १३ हजार ८६१ कोटी रुपये होते, तर या नऊमाहीत ते १६ हजार ५८१ कोटी रुपये झाले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता व एकूण मूल्य यांचे गुणोत्तर ६.६ पट असून ते देशात सर्वोत्तम आहे. त्यातून कंपनीचा वाढता व्यवसाय व नफा दिसतो, असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. कंपनीच्या विमाधारकांच्या देण्यापोटी कंपनीकडे पुरेशी तरतूद आहे. सध्याचे भांडवल आणि उत्पन्न पाहता कंपनीची चांगली वाढ अपेक्षित असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांचे दावे त्वरेने देण्यात कंपनीने आघाडी घेतली आहे. इर्डाच्या २०२१-२२ च्या वार्षिक अहवालानुसार कंपनीने दिलेल्या २३ लाख दाव्यांपैकी ९८.६५ टक्के दाव्यांच्या रकमा तीन महिन्यांत दिल्या आहेत.

-----
इन्शुरन्स क्षेत्रातील सुधारणांचा फायदा
नव्या व्यवसायातही कंपनीची मोठी गुंतवणूक सुरू आहे. सध्याच्या वातावरणाचा तसेच या क्षेत्रातील सुधारणांचा कंपनीला मोठा फायदा होत आहे. गेली तीन वर्षे कंपनीची वाढ १५ टक्क्यांपेक्षाही जास्त होत असून ही या क्षेत्राच्या सरासरी वाढीपेक्षा खूपच जास्त आहे. त्याहीपेक्षा जास्त वाढ यापुढेही होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. मुख्य कंपनी रिलायन्स कॅपिटलकडून जादा भांडवलाची मागणीही कंपनीने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com