
पेटीएमचे वेगवान यूपीआय लाईट
मुंबई, ता. २६ : पेटीएम पेमेंट बँकेतर्फे यूपीआय लाईट ही दोनशे रुपयांपर्यंतची बिले देण्यासाठी अत्यंत वेगवान पद्धती आणली असून ती कधीही अपयशी ठरणार नाही असा कंपनीचा दावा आहे. यूपीआय पेमेंट पद्धतीमार्फत ही पेमेंट केली जातील. मुख्य म्हणजे या व्यवहारांसाठी पिन क्रमांक टाकायची गरज भासणार नाही. पेटीएम ॲपवर एकदाच क्लिक करून हे वेगवान पेमेंट करता येईल. त्यामुळे देशभरात सर्वत्र लहान रकमांसाठीही डिजिटल पेमेंट करणे अत्यंत सोपे होईल असा पेटीएम पेमेंट बँकेचा दावा आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे पेमेंट होईल. ही पद्धती स्वीकारणाऱ्यांना सुरुवातीला एक शंभर रुपयांचा कॅशबॅकही दिला जाईल. सध्या कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्र बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांच्या मार्फत हे व्यवहार होतील.