राज्यात आज कोविडचे ३५ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आज कोविडचे ३५ नवे रुग्ण
राज्यात आज कोविडचे ३५ नवे रुग्ण

राज्यात आज कोविडचे ३५ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः राज्यात आज कोविडच्या ३५ नव्या रुग्णांचे निदान झाले. आज आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८८,९८५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६४,१९,३८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३७,५८३ (०९.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण १७७ सक्रिय रुग्ण आहेत.