Thur, June 1, 2023

मराठी भाषा अधिक समृद्ध करूया!
मराठी भाषा अधिक समृद्ध करूया!
Published on : 27 February 2023, 3:01 am
मुंबई, ता. २७ : जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते, तीच विश्वाची भाषा बनते. हे सर्व गुण मराठीत आहेत. मराठीचा अधिकाधिक वापर करून मराठी भाषा अधिक समृद्ध करू या. त्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून मराठीत बोलले-लिहिले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. विधान भवनात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.