नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात
नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात

नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ही कामे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे महापालिकेने कळवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितली. मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या निविदांना विलंब झाल्याकडे लक्ष वेधत भाजप आमदार आशीष शेलार, पराग अळवणी, तमिल सेलवन यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता.
मुंबईतील नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी नियमितपणे करण्यात येतात. मुंबईतील सर्व छोटे-मोठे नाले, रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महापालिकेमार्फत एकूण ३१ निविदा मागवण्यात आल्या आहेत. सदर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ही कामे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.