नव्या हिरकणी कक्षाची 
नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

नव्या हिरकणी कक्षाची नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

मुंबई, ता. २८ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी सोमवारी (ता. २७) विधान भवनातील हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता. त्याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. यावर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करत पहिल्या मजल्यावर अद्ययावत हिरकणी कक्षाची उभारणी केली. या कक्षाची पाहणी करण्यात आली. दरम्यान, विधिमंडळ नियमात बदल करत महिला आमदारांना तीन महिन्यांची प्रसूती रजा मिळण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या वेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. या सुविधेबाबत आमदार सरोज अहिरे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्यासह अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com