कामांचा धडाका,कामे पूर्ण करण्याची गती मात्र मंदावलेली

कामांचा धडाका,कामे पूर्ण करण्याची गती मात्र मंदावलेली

कामांचा धडाका; परंतु गती मंदावली
तीन महिन्यांत ५०० पैकी १२१ कामेच पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिकेच्या वतीने संपूर्ण महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० वेगवेगळी कामे सुरू करण्यात आली आहेत. त्या कामांना ८ डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची ‘डेडलाईन’ ठेवण्यात आली होती; मात्र तीन महिने पूर्ण होत आले तरी ५०० पैकी केवळ १२१ कामेच पूर्ण झाली आहेत. त्यात अतिरिक्त ३२० कामांनाही सुरुवात करण्यात आल्याने शुभारंभाचा धडाका लावणारी पालिका कामे पूर्ण कधी करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेतर्फे ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. त्या प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाअंतर्गत एकूण ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ व मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. आजपासून काम सुरू झालेल्या १११ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी यंत्रणा तैनात केली गेली असून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे कामे तात्काळ सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी ५० टक्के कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

अशी आहेत कामे
वाहतूक बेटे ः ७०
पदपथ ः ९२
रोषणाई आणि रंगकाम केले जाणारे पूल ः ४३
समुद्रकिनारे ः ६
रस्ते रोषणाई ः २२
रस्ते दुभाजक ः १३
उद्याने ः १५
सुशोभित भिंती ः २४

मुंबई सुशोभीकरणात प्रारंभी हाती घेतलेल्या ५०० पैकी १२१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात वाहतूक बेट, रस्ते दुभाजक, पदपथ, सुशोभित भिंती, उद्याने आणि पुलांच्या कामांचा समावेश आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
- इक्बालसिंह चहल, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com