न्यायालयाच्या संकेतस्थळावर मराठीत निकालपत्रे

न्यायालयाच्या संकेतस्थळावर मराठीत निकालपत्रे

मुंबई, ता. १ : मराठी भाषा दिन नुकताच साजरा झाला असताना आता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील न्यायालयीन प्रकरणांतील निवडक निकालपत्रे मराठी भाषेत न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यास बुधवारपासून प्रारंभ केला.
न्यायालयाच्या संकेतस्थळावर यासाठी निवडक निर्णय या नावाचा रकाना तयार केला आहे. तूर्तास यामध्ये तीन निकालपत्र अपलोड करण्यात आले आहेत. यापैकी एक निकाल हा न्या. डी. एस. ठाकूर आणि न्या. कमल खट्टा यांच्या खंडपीठाचा आहे, दुसरा न्या. डी. एस. ठाकूर आणि न्या. अभय आहुजा आणि तिसरा निकाल न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. तीनही निकाल २० फेब्रुवारीला जाहीर झाले आहेत. संबंधित ऑनलाईन व्यवस्था ही केवळ पक्षकारांना त्यांच्या मातृभाषेत माहितीसाठी उपलब्ध असून याचा अन्य कोणताही वापर होणार नाही, अशी सूचनादेखील यामध्ये आहे. न्यायालयीन अधिकृत भाषा इंग्रजी आहे हेदेखील स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक भाषेत न्यायालयीन निकाल सुरू केले आहेत. याशिवाय केरळमध्ये ही यंत्रणा उपलब्ध आहे. या परंपरेत आता महाराष्ट्रही सामील झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com