युवकाविरोधातील ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकाविरोधातील ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा रद्द
युवकाविरोधातील ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा रद्द

युवकाविरोधातील ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा रद्द

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या १९ वर्षीय युवकावरील फौजदारी तक्रार मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. मुलीच्या आईने ही तक्रार रद्द करण्यासाठी सहमती दिल्यामुळे न्यायालयाने तक्रार रद्द केली. मुलाने मुलीची दिशाभूल केली आणि तिला पळवून नेले, असा आरोप युवकावर ठेवण्यात आला होता; मात्र मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखत असून, ती सहमतीने मुलाबरोबर गेली होती, असा बचाव मुलाच्या वतीने करण्यात आला. विशेष म्हणजे मुलीच्या आईनेदेखील तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ही माहिती पोलिसांना दिली. आमच्यामधील संवादाच्या अभावामुळे ही तक्रार केली, असे आईने स्पष्ट केले. मुलगा १९ वर्षांचा असून विद्यार्थी आहे. यामुळे ही तक्रार रद्दबातल होणे त्याच्यासाठी संयुक्तिक ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि गुन्हा रद्दबातल केला.