शेअर व्यवहार करणाऱ्यांसाठी आयसीआयसीआयची डिजिटल सुविधा

शेअर व्यवहार करणाऱ्यांसाठी आयसीआयसीआयची डिजिटल सुविधा

मुंबई, ता. ३ : शेअर बाजारात व्यवहार करणारे ब्रोकर व त्यांचे गुंतवणूकदार यांच्यासाठी आयसीआयसीआय बँकेने थ्री इन वन खाती डिजिटल प्रकारे देण्याची सुविधा, तसेच अन्य डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. यामार्फत बँकेतर्फे गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन शेअर व्यवहार खाते, डिमॅट खाते तसेच बचत बँक खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. देशात कोणत्याही व्यक्तीला हे खाते कोठूनही काही तासांत उघडता येईल, अशी ही पद्धती आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या शेअरचे व्यवहार अत्यंत सोप्या पद्धतीने करणे शक्य होईल. यातून शेअर ब्रोकर, निधीचे व्यवस्थापन करणारे पोर्टफोलिओ मॅनेजर, परदेशी गुंतवणूकदार, गुंतवणूक फंड आदींना आपल्या बँकिंगविषयक गरजा पूर्ण करता येतील, अशी माहिती बँकेच्या मोठे ग्राहक विभागाचे प्रमुख सुमित संघई यांनी दिली. या सोयीमुळे शेअर बाजार, तसेच डीमॅट खातेदारांच्या गरजा पूर्ण होतील. तसेच शेअर खरेदी-विक्री व्यवहारांची प्रक्रिया सोपी होईल आणि व्यवसायाची व्याप्ती आणि कार्यक्षमता वाढेल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com