मुंबई विद्यापीठात संस्कृत-योगशास्त्राचे अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठात संस्कृत-योगशास्त्राचे अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठात संस्कृत-योगशास्त्राचे अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठात संस्कृत-योगशास्त्राचे अभ्यासक्रम

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे ‘एम. ए. संस्कृत-योगशास्त्र’ हा द्विवर्षीय अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात (२०२३-२०२४) सुरू करण्यात येणार आहे. यासाठीची माहिती मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी दिली.

मुंबई विद्यापीठात संस्कृत विभागाने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत ‘योग- सिद्धांन्त आणि उपयोजन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, या वेळी डॉ. शकुंतला गावडे यांनी ही माहिती दिली. या परिसंवादाला कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, ग्लोबल होलिस्टिक हेल्थ गुरु डॉ. मिकी मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. शकुंतला गावडे म्हणाल्या, की ‘योगशास्त्राचे सिद्धांत संस्कृत भाषेमध्ये असल्याने योगशास्त्रपर संस्कृत ग्रंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पातञ्जल योगसूत्र, योगसूत्रावरील टीका ग्रंथ, हठयोगप्रदीपिका वगैरे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. योगासनांबद्दल जागरुकता निर्माण होताना दिसत असली तरीदेखील त्यामागील सिद्धांत समजून घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते व योगासनांकडे केवळ शारीरिक व्यायाम म्हणून पाहिले जाते. योगशास्त्रामध्ये मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान दिसून येते आणि त्याचे ध्येय केवळ शारीरिक स्वास्थ्यापुरतेच मर्यादित नसून मानसिक व आध्यात्मिक शांती हे होय. हा विचार समाजात रुजवण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरेल.’