नॅक मूल्यांकनाबाबत तज्ज्ञांचा नाराजीचा सूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅक मूल्यांकनाबाबत तज्ज्ञांचा नाराजीचा सूर
नॅक मूल्यांकनाबाबत तज्ज्ञांचा नाराजीचा सूर

नॅक मूल्यांकनाबाबत तज्ज्ञांचा नाराजीचा सूर

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी अधिकारीपदाचा डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा दिल्यानंतर नॅक मूल्यांकनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. यासाठी देशभरातून तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात असून अत्यंत महत्त्वाच्या अशा या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याने त्यात सुधारणा केली जावी, असे मत व्यक्त केले जात आहेत.
देभरातील सरकारी, खासगी विद्यापीठे, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालयांना नॅकचा दर्जा दिला जातो; मात्र त्यात संस्थेच्या मूल्यांकन प्रक्रियेतच काही सदस्यांकडून होत असलेल्या गैरप्रकारामुळे काही खासगी विद्यापीठ आणि संस्थांना मर्यादेपेक्षा जास्त ग्रेड देण्यात आल्याने हा विषय चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच यासाठीच्या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत डॉ. पटवर्धन यांनी नॅकच्या कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिल्याने यावर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसरीकडे नॅकच्या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून वर्षभरापूवीच कारभार सुरू केलेल्या पटर्वधन यांनी येथे बेंच मार्क सुरू केले होते. कारभार पादर्शक व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करत नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेची पहिल्यांदाच श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही नॅकच्या काही सदस्यांकडून गैरप्रकार करत काही संस्थांना वाट्टेल त्या प्रकारे ग्रेड देण्याचे प्रकार सुरू होते.
...
उद्देश चांगला, पण...
याबाबत माजी कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत म्हणाले की, डॉ. पटवर्धनसारख्या तज्ज्ञाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून राजीनामा द्यावा लागतो, यासाठी केंद्र सरकार आणि यूजीसीनेही यातून आत्मपरीक्षण केले पाहिजे. नॅक मूल्यांकनाचा उद्देश चांगला असला, तरी त्याआडून गैरप्रकार होत असल्याने त्याला आवर घालणे आवश्यक होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था भारतातील सर्वांत चांगली संस्था असताना तिच्यापेक्षा खासगी विद्यापीठांना आणि काही संस्थांना नॅकचा मोठा ग्रेड कसा मिळू शकतो?
...
विश्वासार्हता किती?
माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी म्हणाले की, नॅक मूल्यांकनावरून मागील काही महिन्यांपासून वाद चव्हाट्यावर आले. नॅकचे कामकाज हे त्यांचे काही सदस्य आणि काही इतर एजन्सीच्या माध्यमातून केले जाते. कोणते निकष असतात, ते कोणती आकडेवारी ग्राह्य धरून गुणवत्ता सिद्ध करतात, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या एजन्सीला प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि त्यांची विश्वासार्हता किती आहे, हे पाहिले पाहिजे.