Mon, June 5, 2023

मुंबईत धुळवडीला पावसाची संगत
मुंबईत धुळवडीला पावसाची संगत
Published on : 4 March 2023, 4:10 am
मुंबई, ता. ४ : मार्च महिन्यात मुंबईतील तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी धुळवड साजरी होणार असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहेत.
पुढील एक महिना मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याने दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले होते. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून उकाडा वाढल्याने चिंता ही वाढली होती. सोमवारी होळी, तर मंगळवारी धुळवड असून पावसामुळे उत्सवप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे. पालघर आणि ठाण्यातदेखील मंगळवारी पावसाची शक्यता आहे.