ऐंशी लाख मुलांना निःशुल्क शिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐंशी लाख मुलांना निःशुल्क शिक्षण
ऐंशी लाख मुलांना निःशुल्क शिक्षण

ऐंशी लाख मुलांना निःशुल्क शिक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : आम्ही देशात सत्तर लाख मुलांना सशुल्क शिक्षण देतो व त्याचबरोबर ५५ लाख गरीब मुलांना निःशुल्क शिकवतो. त्याचमुळे प्रोत्साहन घेऊन त्यांच्या आयांपैकी वीस हजार जणी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत, हा अनुभव अत्यंत सुखद आहे, असे बायजूज या एडटेक कंपनीच्या सहसंस्थापक दिव्या गोकुळनाथ यांनी सकाळला सांगितले.

तीन ते चाळीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन, ऑनलाईन, लाईव्ह, हायब्रीड असे बारा भाषांमधून क्लास घेणाऱ्या बायजूजने आपल्या एज्युकेशन फॉर ऑल या सामाजिक उपक्रमांतर्गत ५५ लाख मुलांना निःशुल्क शिक्षण दिले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील २५ स्वयंसेवी संस्थांसह देशातील १७५ संस्थांशी सहकार्य केले. या गरीब मुलांमध्ये एड्सग्रस्त, कर्करोगातून बरे झालेली, बालमजुरीतून सुटका झालेली अशी सर्व प्रकारची मुले होती. आता त्यांच्या आयांच्या शिक्षणावरही आम्ही भर देऊ, असेही गोकुळनाथ म्हणाल्या. या उपक्रमासाठी विविध सरकारांशीही आम्ही भागीदारी करीत असून आंध्र प्रदेशात यानुसार आणखी ३० लाख मुलांना शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. मुलांची निवड सरकारने किंवा स्वयंसेवी संस्थांनी केल्यावर त्या मुलांनी फक्त मोबाईलवर आमचे अॅप डाऊनलोड केल्यावर त्यांना शिकवणारे व्हिडीओ आम्ही देऊ. गरजू मुलांना आम्ही फोनदेखील देऊ. हे अॅप मराठीसह १२ भाषांमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था, अन्य जाणकार यांच्याकडून आम्ही सतत शिकत असतो. भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), शिक्षण हे जास्त परिणामकारक, अर्थपूर्ण, पकड घेणारे कसे होईल यावर आमचे सतत शोध आणि संशोधन सुरू असते. देशातील एक कोटी शिक्षक, ५० लाख शाळा, २६ कोटी विद्यार्थी आदी एकत्रितपणे शिक्षणासाठी, मुलांच्या विकासासाठी बरेच काही करू शकतात, असेही गोकुळनाथ यांनी दाखवून दिले.

शाळा की क्लास
...............................
क्लासला महत्त्व दिल्यामुळे शालेय शिक्षणाला दुय्यम महत्त्व मिळते, या मुद्द्यावर बायजूज या एडटेक कंपनीच्या सहसंस्थापक दिव्या गोकुळनाथ म्हणाल्या, की ‘शाळा हे तर शिक्षणाचे अविभाज्य अंग आहेच, शाळेतच मुलांची पायाभरणी होते, तेथे ते अनेक कौशल्ये शिकतात, त्याला दुसरा पर्यायच नाही. पण आम्ही शालेय शिक्षणाच्या पलीकडे समग्र शिक्षणावर भर देतो. भारत ही जगाची शैक्षणिक राजधानी असल्याने आपण एकत्र मोठा परिणाम घडवला पाहिजे. असे बायजूज प्रत्येक देशात उभारले पाहिजेत.’