एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे सायक्‍लोथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे सायक्‍लोथॉन
एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे सायक्‍लोथॉन

एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे सायक्‍लोथॉन

sakal_logo
By

एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे सायक्‍लोथॉन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘कलर्स ऑफ एम्पॉवरमेंट’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा भाग म्हणून ‘सायकलिस्ट’ या मुंबईतील सायकलपटूंच्या गटाच्या सहयोगाने सायकलोथॉनचे आयोजन केले. ‘कर्करोगाला प्रतिबंध करा, जीव वाचवा’ हा संदेश देत कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. या उपक्रमात १२० सायकलपटूंनी सहभाग घेतला. मरिन ड्राईव्ह येथे १५ किमीच्या सायकलस्वारीसाठी अनेक सायकलस्वार उपस्थित होते. सहभागींनी एकत्रित सायकल चालवत महिलांच्या आव्हानावर मात करण्याच्या आणि उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या क्षमतेला सलाम केला.