
भारतीय महिला लोककला संमेलन बुधवारपासून
मुंबई, ता. ५ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी ‘मी आनंदयात्री’ महिला कला महोत्सव २०२३ या लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १२ मार्चपर्यंत चालणार असून त्यात महिलांवर आधारित विविध परिसंवाद, सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १० वाजता रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थान रिसर्चर आणि ऑथर डॉ. संध्या पुरेचा भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे करतील; तर त्यानंतर मान्यवरांची भाषणे होतील. दिवसभराच्या कार्यक्रमात परिसंवाद, भक्तिरंग आदी विविध कार्यक्रम होतील.