मद्य पिऊन कर्तव्यावर आढळल्यास कारवाई

मद्य पिऊन कर्तव्यावर आढळल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करूनच त्यांना कर्तव्यावर पाठवणे गरजेचे आहे. या नियमाची विभाग पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून एसटीच्या मुख्यालयाला निदर्शनास आल्याने कर्तव्यावर असताना एसटी कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे करण्याचे सक्त आदेश एसटीचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने कामगिरीवर जाणाऱ्या चालक, वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करूनच त्यांना कर्तव्यावर पाठविणे क्रमप्राप्त आहे; परंतु सदर बाबतीत आगारांकडून, विभागांकडून दक्षता घेण्यात येत नाही. अशा घटनांमुळे प्रसिद्धिमाध्यमांवर एसटी महामंडळाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मद्यप्राशन करून कर्तव्य बजावणाऱ्या संशयितांची यादी तयार करून विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या सूचनासुद्धा दिल्या आहेत.
...
अशाही दिल्या सूचना
- विभागीय वाहतूक अधिकारी यांनी विभागातील संभाव्य मद्यपान करणारे चालक, वाहक यांची वेळोवेळी गोपनीय पद्धतीने तपासणी करावी.
- अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करावी.
- विभागातील सर्व मार्गतपासणी पथके, वाहतूक निरीक्षक, चालक प्रशिक्षण व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत तपासणी कार्यक्रम राबवावे.
- बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रक यांनी चालकाद्वारे लॉगशीटची नोंद करत असताना चालक हा मद्यप्राशन करून नाही, याची खातरजमा करावी.
- नियंत्रण कक्षात लॉगशीटची नोंद स्वतः चालकानेच करावी
- लाॅगशीटची नोंद करायला वाहक आल्यास गंभीर दखल घेऊन अशा वाहक, चालकावर कारवाई करावी.
- मद्यप्राशन करून आढळल्यास पोलिस फिर्याद वैद्यकीय चाचणी व प्रमादीय अहवाल तयार करून कारवाई केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com