व्हिक्टोरिया अंधशाळेतील मुलांना अन्नविषबाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिक्टोरिया अंधशाळेतील मुलांना अन्नविषबाधा
व्हिक्टोरिया अंधशाळेतील मुलांना अन्नविषबाधा

व्हिक्टोरिया अंधशाळेतील मुलांना अन्नविषबाधा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध शाळेमध्ये सात मुलांना अन्नविषबाधा झाली आहे. दुपारच्या जेवणानंतर मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारांसाठी तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
ताडदेव येथील अंधशाळेत दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आज रंगपंचमीचा उत्सव असल्याने ठराविक मुलेच शाळेत होती. नेहमीप्रमाणे मुलांनी नाष्टा व दुपारचे जेवण केले. त्यानंतर काही वेळाने मुलांच्या पोटात दुखू लागले. काही मुलांना उलट्याही सुरू झाल्या. यामुळे शाळेमध्ये एकच धावपळ सुरू झाली. शाळा प्रशासनाने या मुलांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या नायर रुग्णालयात दाखल केले. बाधित सातपैकी पाच मुले १२ वर्षांवरील; तर दोन मुले १२ वर्षांखालील आहेत. पाच जणांना उलट्या तसेच पोटदुखीचा त्रास जाणवला; तर दोघांना ताप आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. बाधितांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.
...
बाधा झालेल्या मुलांची नावे
अनिकेत राऊत, कल्पेश पवार, सुमित सरकार, सोमनाथ मुडकत, अक्षय मोनिस्वारे, शादाब कुरेशी, आणि परमेश्वर दागने अशी मुलांची नावे आहेत. मुलांना अन्नविषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे.