Thur, June 1, 2023

पेटीएमची होळीनिमित्त मोठी कॅशबॅक ऑफर
पेटीएमची होळीनिमित्त मोठी कॅशबॅक ऑफर
Published on : 7 March 2023, 2:05 am
मुंबई, ता. ७ : पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन नाईन सेवन कम्युनिकेशन्सतर्फे होळीनिमित्त आठवडाभर ग्राहकांना चौदा हजार कॅशबॅक पॉइंट देण्याची योजना आणली आहे.
या आठवड्यात त्यासाठी ग्राहकांना पेटीएम यूपीआय, यूपीआय लाईट, पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मार्फत पेमेंट करून कॅशबॅक पॉइंट मिळवता येतील. यासाठी ग्राहकांना नऊ कार्डे जमवावी लागतील. पेटीएम ॲपमार्फत पेमेंट केल्यानंतर पेटीएम कॅशबॅक ऑफरमध्ये जाऊन तेथे प्ले ॲण्ड विन फॉर्टीन थाऊजंड कॅशबॅक पॉइंट बॅनरवर क्लिक करून तेथून नऊ कार्डे मिळवून ती स्क्रॅच करावी लागतील. कार्ड स्क्रॅच केल्यानंतर ती तीन दिवसांत संपतील.