Wed, June 7, 2023

जळगांवातील उद्योगांचे प्रश्न उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
जळगांवातील उद्योगांचे प्रश्न उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Published on : 8 March 2023, 1:37 am
मुंबई, ता. ८ : जळगाव जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी गुरुवारी (ता. ९) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत विशेष बैठक होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी व जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजक संगीता पाटील यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी आयोजित जळगाव जिल्हा विकास परिषदेत जळगाव जिल्ह्याच्या उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सामंत यांनी जळगाव जिल्ह्याच्या उद्योग-व्यापार क्षेत्राच्या प्रश्नांसंबंधी मुंबईत बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही बैठक होईल.