म्हाडाच्या सोडतीसाठी
नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

मुंबई, ता. ८ : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४,६४० सदनिका आणि १४ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणीस आजपासून (ता. ८) सुरुवात झाली. सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन सोडत १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘आयएचएलएमएस २.०’ या नव्या संगणकीय प्रणालीनुसार नोंदणीदरम्यानच सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी नव्या प्रणालीनुसार अर्जदारास घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. नोंदणी करणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता ‘आयएचएलएमएस २.०’ ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा आयओएस या दोन्ही प्रकारच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकतात. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.
---
पहिल्या दिवशी ३७९ अर्ज
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण १,४५६ सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नोंदणीच्या पहिल्याच दिवशी ३७९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
---
महत्त्वाच्या तारखा
अर्ज दाखल करणे - १० एप्रिल रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन तसेच आरटीजीएस/एनईएफटीद्वारे शुल्कभरणा - १२ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत
सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध - ४ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता
पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत - १० मे रोजी सकाळी १० वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com