उच्च शिक्षणासाठी अनुदानावर भर; तर कौशल्य विकासला झुकते माप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्च शिक्षणासाठी अनुदानावर भर; 
तर कौशल्य विकासला झुकते माप
उच्च शिक्षणासाठी अनुदानावर भर; तर कौशल्य विकासला झुकते माप

उच्च शिक्षणासाठी अनुदानावर भर; तर कौशल्य विकासला झुकते माप

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : राज्याच्या अर्थसंकल्पात उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना अनुदाने आदींचा समावेश आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही, तर दुसरीकडे कौशल्य विकासाला झुकते माप देण्यात आले आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर या अर्थसंकल्पात सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
उच्च शिक्षणाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना ५०० कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई, लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला. तसेच नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
--
वैद्यकीय महाविद्यालयाची बांधकामे
वैद्यकीय शिक्षणातील अर्थसंकल्पात राज्यात १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे केली जाणार असून यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) या ठिकाणांचा समावेश आहे.