आजपासून मुंबई तमाशा प्रशिक्षण शिबीर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार

आजपासून मुंबई तमाशा प्रशिक्षण शिबीर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार

आजपासून मुंबई तमाशा प्रशिक्षण शिबिर
मुंबई, ता. ११ : तमाशा या लोककलेची आवड असलेल्या तरुण आणि तरुणींना त्या विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मुंबईत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर तब्बल २० दिवस चालणार असून त्याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सांस्कृतिक भवन इमारतीत असलेल्या लोककला अकादमीमध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. हे तमाशा प्रशिक्षण शिबिर संचालक आणि लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून यात राज्यभरातील एकूण ३० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालय दर वर्षी नवीन कलाकारांना घडविण्यासाठी तमाशा या लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देते. यामध्ये विविध भागातील नवोदित कलाकार सहभाग घेत असतात. या वर्षीचे हे शिबिर मुंबईत होत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, पत्रकार खंडूराज गायकवाड, अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे, व्याख्याते डॉ. मंगेश बनसोड आदी मान्यवर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे. या शिबिराचे सहायक म्हणून सुभाष खरोटे आणि विकास कोकाटे यांची निवड करण्यात आली असून समन्वयक म्हणून डॉ. शिवाजी वाघमारे हे कामकाज पाहणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com