मंडळाच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडळाच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवा!
मंडळाच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवा!

मंडळाच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : सोशल मीडियावर हिंदीच्या पेपरचे चुकीचे वेळापत्रक व्हायरल झाल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर आले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉलतिकिटावर वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यामुळे ते हॉलतिकीट आणि शाळांना देण्यात आलेल्या वेळापत्रकाव्यतिरिक्त वेळापत्रकाचा आधार घेण्यात आला, तर त्याला विद्यार्थीच जबाबदार राहतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
८ मार्चला हिंदीचा पेपर असताना काही विद्यार्थ्यांना व्हायरल वेळापत्रकामुळे पेपरला मुकावे लागले होते. त्यामुळे मंडळाच्या संकेतस्थळावर, हॉ‍लतिकीट आणि शाळांना पाठविण्यात आलेल्या वेळापत्रकांव्यतिरिक्त कोणत्याही वेळापत्रकाचा आधार विद्यार्थ्यांनी घेऊ नये, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.