पाम तेलाबाबत आशियाई देशांचे हितसंबंध जपण्याचा निर्धार

पाम तेलाबाबत आशियाई देशांचे हितसंबंध जपण्याचा निर्धार

मुंबई, ता. १२ : पामतेलाचा आशियातील खप ४० टक्के असून युरोपातील खप नऊ टक्के आहे. तरीही पामतेल उत्पादक हे आशियाई खरेदीदारांकडे दुर्लक्ष करून युरोपचे निकष पूर्ण करण्यासाठी धडपडतात. त्यामुळे आशियाई देशांचे हितसंबंध जपण्याचा निर्धार एशियन पाम ऑइल अलायन्सच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

आशियात पाम तेलाचा खप मोठा असल्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमधील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रमुख संघटनांनी ‘एशियन पाम ऑईल अलायन्स’ स्थापन केले आहे. त्याच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी दिली. या संघटनेत अन्य आशियाई देशांचाही समावेश करावा, असेही या वेळी सांगण्यात आले. मलेशिया व इंडोनेशिया हे मोठे पाम तेल उत्पादक देश असून या संघटनेचे सदस्य असलेले आशियाई देश त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत फार अडथळे आणत नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असे गोदरेज इंटरनॅशनलचे संचालक दोराब मिस्त्री यांनी सांगितले; तर बहुतांशी उत्पादक युरोपियन खरेदीदारांच्या मागण्या पूर्ण करण्यास धडपडत असतात; मात्र आशियाई देशांकडे दुर्लक्ष केले जाते. ही स्थिती बदलावी लागेल, असे मत सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com