Sun, May 28, 2023

राज्यात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण
राज्यात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण
Published on : 12 March 2023, 2:01 am
मुंबई, ता. १२ : राज्यात आज कोरोनाच्या १०१ नवीन रुग्णांचे निदान झाले. ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८९,४६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६५,०१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३८,४३७ (०९.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण ५५१ सक्रिय रुग्ण आहेत.