पु. ल. अकादमीतील महिला कला महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पु. ल. अकादमीतील महिला कला महोत्सवाची सांगता
पु. ल. अकादमीतील महिला कला महोत्सवाची सांगता

पु. ल. अकादमीतील महिला कला महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : सांस्कृतिक कार्य विभाग व पु. ल. देशपांडे राज्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मी आनंदयात्री’ या महिला कला महोत्सवाची रविवारी (ता. १२) सांगता झाली. अखेरच्या दिवशी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित भैरवी-मिले सूर मेरा तुम्हारा या कार्यक्रमाने सांगता झाली; तर दुपारी सुगंधा धुळप आणि सहकाऱ्यांनी मनाचा ठेका धरणारे लोकनृत्य सादर केले. सायंकाळी राज्य साहित्य संस्कृती व मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील आणि सहकाऱ्यांनी मी आनंदयात्री हा संवादाचा कार्यक्रम सादर केला.
सकाळच्या सत्रात गौरी पेंडसे यांचे कथ्थक; तर झेवियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत आणि डहाणूकर महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. यासोबत साठे, केसी, ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या अनेक कला सादर केल्या. स्वामी नाट्यांगणनने नवरा आला वेशीपाशी ही एकांकिका सादर केली. महिला महोत्सवात महिलांवर आधारित विविध परिसंवाद, सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.