बिबट्याच्या मुक्त संचाराने दहशत

बिबट्याच्या मुक्त संचाराने दहशत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मालाड पूर्वेतील न्यू दिंडोशीमधील म्हाडाच्या रॉयल्स हिल्स सहकारी संस्थेच्या ७७ इमारतींच्या परिसरात मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर सरकारने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक राहिवाशांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून केली आहे.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी न्यू दिंडोशीमध्ये म्हाडाने २००५ मध्ये बांधलेल्या रॉयल हिल्स सहकारी गृहनिर्माण संस्थेचे ७७ बंगले असून त्यामध्ये ५०० रहिवासी कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. ७ व ८ मार्च रोजी सलग दोन दिवस मध्यरात्री येथील बंगल्याच्या एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे सीसी टीव्ही फुटेजमधून निदर्शनास आले आहे. यामुळे स्थानिक ५०० रहिवासी कुटुंबे भयभीत झाली आहेत. गेल्या ८ ते १० वर्षात अधून-मधून तीन ते चार वेळा बिबट्याचा वावर होत असे; परंतु आता गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून सोसायटीच्या आवारात बिबट्या येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

७ मार्चच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बंगला क्र. ४५ डी. ४५-सी. ४५ वी. ४५ ए आणि ४४-डी च्या गच्चीवर बिबट्या एक तासाहून अधिक काळ होता. ८ मार्चच्या मध्यरात्रीही बिबट्याची हालचाल सोसायटीच्या सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिंडोशी मतदारसंघातील आमदार सुनील प्रभू यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे न्यू दिडोशी रॉयल हिल्स सहकारी संस्थेच्या ५०० रहिवासी कुटुंबांचे बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करावी, अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com