Sun, May 28, 2023

संपाला ‘आप’चा पाठिंबा
संपाला ‘आप’चा पाठिंबा
Published on : 13 March 2023, 2:27 am
संपाला ‘आप’चा पाठिंबा
जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, यासाठी आजपासून (ता. १४) सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला, तसेच त्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा असल्याचे मत पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.