Thur, June 1, 2023

काँग्रेसचा मोर्चा चौपाटीवर रोखला
काँग्रेसचा मोर्चा चौपाटीवर रोखला
Published on : 13 March 2023, 3:42 am
मुंबई, ता. १३ : अदाणी उद्योग समूहाची चौकशी व्हावी या मागणीसाठी मुंबई काँग्रेसने आज राजभवनावर धडक मोर्चा काढला. काँग्रेस कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने जमले होते. तेथून मोर्चा राजभवनाकडे जाणार होता; मात्र पोलिसांनी त्यांना चौपाटीवरच रोखले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राजभवन मार्गावर पोलिस उपायुक्त अभिनव देशमुख यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते. येथील सेल्फी पॉइंट काही काळ बंद ठेवण्यात आला होता. आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.