कोटक महिंद्रचा सिल्वर फंड बाजारात

कोटक महिंद्रचा सिल्वर फंड बाजारात

मुंबई, ता. १३ : कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतर्फे आज कोटक सिल्वर ईटीएफ फंड ऑफ फंड बाजारात आणल्याचे जाहीर करण्यात आले. हा एनएफओ इशू आजपासून गुंतवणुकीस खुला झाला असून त्यात २७ मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. यापूर्वी चांदीने वस्तू म्हणून अडचणीच्या काळात गुंतवणुकीला संरक्षण मिळवून दिले होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पेचप्रसंगामुळे निफ्टी दहा टक्के पडलेला असताना चांदीचे भाव बारा टक्के वाढले होते. या फंडात गुंतवणूक करणे अत्यंत सोपे असून डिमॅट अकाऊंट नसतानाही त्यात अन्य म्युच्युअल फंडांच्या योजनांप्रमाणे गुंतवणूक करता येईल. यामुळे ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीचा विस्तार करता येईल, युनिटची विक्रीही सहजपणे होईल आणि त्याचे शुल्कही अत्यंत कमी असेल, अशी माहिती कोटक महिंद्र असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी दिली. या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांना चांदीच्या गुंतवणुकीतही मुक्तद्वार मिळेल. सध्याचे चांदीचे भाव पाहता मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदार गुंतवणूकदारांसाठी ती चांगली संधी आहे असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com