बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रासाठी सल्लागार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रासाठी सल्लागार समिती
बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रासाठी सल्लागार समिती

बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रासाठी सल्लागार समिती

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. बाळासाहेब आपटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र मुंबई विद्यापीठात सुरू होणार आहे. यासाठी सल्लागार समिती नेमण्यात यावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्राबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब आपटे यांचे शिक्षण विषयक, विद्यार्थीविषयक कायदा क्षेत्रातील कार्य खुप मोठे आहे. त्यांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच नव्या पिढीला त्यातून शिकता यावे, यासाठी विविध स्तरावर कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. जून पासून यासाठीच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे आदेशही या वेळी पाटील यांनी दिले.
अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बाळासाहेब आपटे यांच्या सोबत काम केलेल्या वरिष्ठ सहकार्यांसह शिक्षण क्षेत्रीतील अभ्यासकांना या सल्लागार समितीमध्ये घेण्यात यावे आणि सर्वंकष असा अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या अध्यासनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून निधीची उपलब्धताही झाली आहे. या अध्यासनासाठी पदांची निर्मितीही करण्यात येत आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.