दादरची शान वाढणार

दादरची शान वाढणार

मुंबई, ता. १४ : शिवाजी पार्क, चौपाटी आणि कबूतरखाना म्हणजे दादरची प्रमुख ओळख. तिन्ही स्थळांचे मुंबईकरांमध्ये विशेष महत्त्व आहे. म्हणूनच त्यांचे सुशोभीकरण करून मेकओव्हर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच दादरमधील जुनी स्थळे कात टाकणार असून शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहेत.

दादरमधील मुख्य आकर्षण असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्काचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पार्कमध्ये येणारी दररोजची गर्दी लक्षात घेऊन सभोवती अत्याधुनिक बैठक व्यवस्था बसवली जाणार आहे. त्याशिवाय पार्क परिसर अधिक आकर्षक दिसावा म्हणून एलईडी स्ट्रीप लाईट लावण्यात यणार आहेत. त्यासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.
दादर चौपाटीवरील व्ह्युइंग डेक आणि कबूतरखान्याचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. माता रमाबाई व्ह्युइंग डेक परिसरात साऊंड शोसह वॉटर कर्टन आणि गोबो लाईट्स बसवल्या जाणार आहेत. लाईट प्रोजेक्शच्या मॅपिंगची स्टॅण्डर्ड इंटरनॅशनल ट्रेड क्लासिफिकेशन (एसआयटीसी) आणि डिझाईनिंगसाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

आठवडाभरात निविदा
जी/उत्तर वॉर्डमध्ये दादर रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या कबूतरखाना द्वीपची आकर्षक रोषणाईने सजावट केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचा मानस आहे, असे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com