मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, ता. १४ : मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र २०२३ च्या विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा आणि त्याचे सविस्तर वेळापत्रक आज जाहीर केले. विविध अभ्यासक्रमांच्या ४३१ परीक्षा घेतल्या जाणार असून त्यांची सुरुवात २७ मार्चपासून होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.
उन्हाळी सत्रांच्या परीक्षांमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र सहाची परीक्षा ५ एप्रिल; तर तृतीय वर्ष बी.ए. व बी.एस्सी. सत्र पाचच्या परीक्षा १२ एप्रिल व बीएमएस सत्र सहाची परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
विद्यापीठ दरवर्षी चार विद्या शाखांच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ८५ परीक्षा, वाणिज्य विद्या शाखेच्या ९७ परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या ११६ परीक्षा; तर आंतरविद्याशाखेच्या १३३ अशा ४३१ परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखांच्या सर्व परीक्षांच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
...
परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करण्यात आला आहे.
- डॉ. प्रसाद कारंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com