पुनर्विकास धोरणात बदल करा, म्हाडा संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकास धोरणात बदल करा, म्हाडा संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
पुनर्विकास धोरणात बदल करा, म्हाडा संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

पुनर्विकास धोरणात बदल करा, म्हाडा संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

पुनर्विकास धोरणातील बदलासाठी
म्हाडा संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या भायखळा परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबद्दलच्या नवीन धोरणाबाबत राहिवाशांनी काही हरकती-सूचना मांडल्या होत्या. म्हाडा संघर्ष समितीच्या वतीने त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात आल्या. मात्र, सरकारने आश्वासन देऊनही नवीन धोरणात तुटपुंजा बदल केल्याची धारणा संघर्ष समितीची झाली आहे. त्याचा निषेध म्हणून आझाद मैदानात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. सह्याद्री अतिथीगृहात १८ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हाडा कृती संघर्ष समितीमधील भाडेकरूंच्या बैठकीत ३३ (२४) खंडातील त्रुटी सुधारित करून नवीन धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार २०२२ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुधारित आवृत्तीला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा भाडेकरूंना होती; परंतु पुन्हा एकदा निराशा पत्करावी लागली, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्नाची दखल घेतली नाही, तर लवकरच आझाद मैदानात आक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुभाष तळेकर यांनी दिला आहे.