Sun, May 28, 2023

मलिक यांच्या जामिनावर
२० मार्चला सुनावणी
मलिक यांच्या जामिनावर २० मार्चला सुनावणी
Published on : 15 March 2023, 11:53 am
मुंबई, ता. १५ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर ईडीचे वकील उपस्थित न राहिल्याने मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी २० मार्चला होणार आहे.
मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयाच्या परवानगीने कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उच्च न्यायालयात त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी मागील महिन्यात अर्ज केला होता. आज ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह उपलब्ध नसल्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या न्यायालयापुढे याचिकेवर नव्याने सुनावणी होणार आहे.