मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू 
निवडीसाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी शोध समितीकडून आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत; मात्र ही निवड प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता नवे कुलगुरू मिळण्यासाठी जून महिना उजाडेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
तत्कालीन राज्यपाल तथा कुलपतींनी ३० जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू संदर्भातील शोध समिती गठित केली होती. त्यात आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश कुमार (यूजीसी प्रतिनिधी) यांचा समावेश होता. ही समिती आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू संदर्भातील उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणार आहे.
तत्कालीन कुलगुरू सुहास पेडणेकर हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी निवृत्त झाले होते. त्यानंतर तीन महिन्यांत नव्या कुलगुरूंसाठी कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु आता जाहिरात प्रसिद्ध झाली, तरी ही प्रक्रिया तब्बल तीन महिने चालणार असल्याने नव्या कुलगुरूंसाठी जून महिना उजाडणार आहे.
---
१५ एप्रिलपर्यंत मुदत
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने २४ डिसेंबरला कुलगुरूंच्या निवडीसाठी शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या पूर्ततेबाबतची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह १५ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.