म्हाडाच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

म्हाडाच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत काढण्यात येणारी घरांच्या विक्रीची सोडत अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता प्रथम निश्चित करण्यात येत आहे. याचा फटका लॉटरीला बसला आहे. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी गेल्या ८ दिवसांत केवळ पाच हजार ७६६ लोकांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४,६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘आयएचएलएमएस’ प्रणालीनुसार नोंदणीकरणादरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे पात्र ठरत आहेत. त्यानुसार अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांची पात्रता प्रथम निश्चित करण्यात येत आहे. त्यानंतरच अर्जदाराचा सोडतीमध्ये समावेश होत आहे. त्यानुसार सोडतीच्या पहिल्याच दिवशी ३७९ लोकांनी अर्ज केले, तर १३८ लोकांनी अर्जासोबत शुल्कभरणाही केला होते. हळूहळू प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा होती; मात्र आज आठ दिवसानंतर अर्जदारांचा आकडा पाच हजार ७६६ वर पोचला असून २७२८ अर्जदारांनी शुल्क भरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com