वाडिया हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडिया हत्येप्रकरणी
दोघांची निर्दोष सुटका
वाडिया हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष सुटका

वाडिया हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : उद्योगपती नस्ली वाडिया यांच्या हत्येच्या कटाबाबत सन १९८९ मधील प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी दोघांची मुक्तता केली. विशेष न्या. एस. पी. नाईक-निंबाळकर यांनी आरोपी इवान सिक्वेरा आणि रमेश जगोटीया यांना निर्दोष जाहीर केले. व्यावसायिक वैमनस्यातून हा प्रयत्न करण्यात आला होता, असा पोलिसांनी आरोप केला होता; मात्र अभियोग पक्ष सबळ पुरावे सादर करू शकला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणात चौघांवर सन २००३ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी आरोपी अर्जुन बाबरियासह अन्य एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. वाडिया त्यावेळी बॉम्बे डाईंगचे अध्यक्ष होते. राज्य सरकारने हा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला होता.