पोलिसांनी तक्रार घेतली नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी तक्रार घेतली नाही
पोलिसांनी तक्रार घेतली नाही

पोलिसांनी तक्रार घेतली नाही

sakal_logo
By

किकर - आयआयटी आत्महत्या प्रकरण
मुंबई, ता. १६ : आयआयटी मुंबईत आत्महत्या केलेल्या दर्शन सोळंकी याच्या पालकांनी संस्थेविरोधात तक्रार करण्यासाठी पवई पोलिस ठाण्यात धाव घेतली होती, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याची माहिती सोळंकी यांच्या पालकांनी दिली.
दर्शन सोळंकीचे आई-वडील आज मुंबईत आले होते. आपल्या मुलाच्या आत्महत्येविरोधात आयआयटी मुंबईविरोधात एफआरआय दाखल करण्यासाठी ते पवई पोलिस ठाण्यात गेले, परंतु पोलिसांनी स्वतंत्र एफआयआर घेण्यास नकार दिला. याबाबत अगोदरच एक चौकशी सुरू असताना स्वतंत्र एफआयआर घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले. पोलिसांकडून तपास सुरू असला, तरी ज्या संस्थेच्या त्रासामुळे आमच्या मुलाने आत्महत्या केली, त्याविरोधात तक्रार करायची होती. त्यामुळे आम्ही आज मुंबईत आलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलम ३०२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा १९८९ अंतर्गत कलमे लावलेली नाहीत. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार करण्यासाठी आम्ही आलो होतो, असे दर्शनच्या पालकांनी सांगितले.
---
समाधानकारक उत्तरे नाहीत
दरम्यान, पवई पोलिसांकडून या प्रकरणात विशेष अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाद्वारे चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असताना आम्ही स्वतंत्र एफआयआर घेऊ शकत नाही. यासंदर्भात आणखी तक्रार द्यायची असेल, तर आपण विशेष चौकशी पथकाकडे ती द्यावी, असे पोलिसांनी दर्शनच्या पालकांना सांगितले. त्यानुसार त्यांनी चौकशी पथकाच्या कार्यालयात जाऊन माहिती विचारली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.