मुंबईतील शिक्षण कार्यालयांना संपाचा सर्वाधिक फटका

मुंबईतील शिक्षण कार्यालयांना संपाचा सर्वाधिक फटका

मुंबई, ता. १७ : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा सर्वाधिक फटका मुंबईतील शिक्षण कार्यालयाला बसला आहे. मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने हे कार्यालय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
दुसरीकडे मुंबईतील जोगेश्वरी, दादर आणि चेंबूर येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयातही अशीच अवस्था असून तेथेही कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आरटीई प्रवेश प्रकियेला मुदतवाढ देण्यात आली आहे; तर दुसरीकडे वेतन पथक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियमित कामकाज, शाळांच्या मान्यता, पदमान्यता आदी सर्व कामकाज ठप्प झाले आहेत. दरम्यान, आज उत्तर विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर शिक्षक परिषदेने १४ मार्चच्या जी. आर. सामूहिकरीत्या फाडून निषेध नोंदवला. मुंबईत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आझाद मैदान बेलार्ड इस्टेट, पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालय, दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालय, उत्तर विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालय येथे धरणा व प्रदर्शन आंदोलन केल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली; तर ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आदी जिल्हा कार्यालयासमोर शिक्षण क्रांती संघटनेने निदर्शने करून आपला निषेध नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com