रिलायन्समार्फत दोन लाख लोकांना नवी ‘दृष्टी’

रिलायन्समार्फत दोन लाख लोकांना नवी ‘दृष्टी’

मुंबई, ता. १७ : ‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ या उपक्रमांतर्गत वीस हजारांहूनही जास्त निःशुल्क यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करण्यात आले; तर आतापर्यंत पावणेदोन लाखांहूनही जास्त गरजूंना सेवा देण्यात आली आहे. गरजूंची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी नुकतेच हिंदीमागोमाग मराठी भाषेत ब्रेल वृत्तपत्र सुरू करण्यात आल्याची घोषणा रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी केली. दृष्टिहीन समुदायांना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी यापुढेही आम्ही कार्यरत राहू, असेही त्या म्हणाल्या.

‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ हा उपक्रम सन २००३ मध्ये सुरू झाला असून त्याद्वारे देशभर नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जातात. दृष्टिदोष असणाऱ्यांना चष्मेही दिले जातात. दृष्टी सुधारण्यासाठी मोतीबिंदू आणि कॉर्नियल प्रत्यारोपण या शस्त्रक्रियाही केल्या जातात. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, शंकरा नेत्र फाऊंडेशन आणि अरविंद आय केअर यांच्यातर्फे हे उपक्रम केले जातात. दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी’ तर्फे त्यांनी तयार केलेले दिवे आणि इतर भेटवस्तू यांसारखी उत्पादने खरेदी केली जातात. सनराईज कॅंडलसारख्या संस्थांच्या सहकार्याने यासाठी काम केले जाते. या उपक्रमाद्वारे भारतातील एकमेव पाक्षिक आंतरराष्‍ट्रीय ब्रेल वृत्तपत्र आता मराठीतही सुरू झाले आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या सहकार्याने त्याची निर्मिती होते. नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘दृष्टी’तर्फे वार्षिक निबंध लेखन आणि कलास्पर्धा आयोजित केल्या जातात.
---
गंगारामला मिळाली दृष्टी
लातूर येथील गंगाराम सदानंदे (वय २४) यांना अंधत्व आल्याने शाळा सोडावी लागली. ते दैनंदिन कामासाठीही आईवर अवलंबून होते. मात्र, रिलायन्स फाऊंडेशन दृष्टीच्या माध्यमातून त्यांच्यावर कॉर्नियल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता ते पाहू शकतात आणि स्वतः ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात, अशी माहितीही फाऊंडेशनतर्फे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com