
सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची आज (ता. १८) मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत यांची ही सदिच्छा भेट होती. रजनीकांत हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे समर्थक होते, याची आठवण करून देताना, ही अराजकीय स्वरूपाची भेट होती, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगीतले. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
सुपरस्टार रजनीकांत यांची मातोश्रीला दिलेली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २०१० मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मातोश्रीवर रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी रजनीकांत यांचे स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी रजीनीकांत यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करतानाचा फोटो ट्विट केला. दुसऱ्यांदा रजनीकांत यांचे मातोश्रीला भेट देणे हा आनंददायी क्षण असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.