सहलीसाठी कोट्यवधींचा खर्च

सहलीसाठी कोट्यवधींचा खर्च

मुंबई, ता. १८ : मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काढण्यात आलेल्या सहलीचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांना पाणी आणि नाष्टा यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सहलीचा वाईट अनुभव आला असल्याने यासाठी जबाबदार आलेल्या कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणी युवासेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

चौथी आणि सातवीतील जवळपास ३ हजार २०० विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त नेतृत्व गुण, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रासंगिक नोंदी आदींचे विकसन होण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुंबईतील एच पूर्व व एच पश्चिम विभागातील शाळांमधील मुलांची सहल गेली होती. या सहलीबाबत काही पालकांकडून तक्रारी आल्या असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांचे पिण्याचे पाणी, खाणे यांचे अतोनात हाल झाले आहेत, असे युवासेनेने शिक्षणमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
--
सहलीचा खर्च
सहलीला जाणारे चौथीचे विद्यार्थी- ३४ हजार २६७.
प्रतिविद्यार्थी खर्च- ५६४ रुपये
एकूण खर्च- १ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये
--
सहलीला जाणारे सातवीचे विद्यार्थी- ३४ हजार ६२.
प्रतिविद्यार्थी खर्च- ६०० रुपये
एकूण खर्च- ३ कोटी ९७ लाख ५२ हजार रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com