गुंतवणुकदारांच्या शिक्षणासाठी ‘एस द इंडेक्स’

गुंतवणुकदारांच्या शिक्षणासाठी ‘एस द इंडेक्स’

मुंबई, ता. १९ ः भारतातील बऱ्याच किरकोळ गुंतवणूकदारांनी आपल्याला शेअरबाजारातून नेमका किती फायदेशीर परतावा मिळायला हवा, याचे नेमके लक्ष्य ठरवलेले नसते. अनेकांना तर किती परतावा मिळाला, हेदेखील ठाऊक नसते. अशांसाठी सॅमको सिक्युरिटीजतर्फे ‘मिशन एस द इंडेक्स’ ही योजना आणली गेली आहे. सॅमकोतर्फे भारतातल्या प्रमुख दहा शहरांमधील तरुण गुंतवणूकदारांचे सर्वेक्षण केले असता त्यांना वरील माहिती मिळाली.

सेन्सेक्स, निफ्टी आदी शेअरबाजार निर्देशांक जेवढा परतावा देतात, तेवढाही परतावा ६७ टक्के गुंतवणूकदारांना मिळत नाही. ६५ टक्के गुंतवणूकदारांना आपल्याला किती परतावा मिळाला, हेदेखील ठाऊक नसते; तर निर्देशांकांपेक्षा जास्त परतावा कसा मिळवायचा हे ५० टक्के गुंतवणूकदारांना ठाऊक नसते. गुंतवणूकदार टीपवर विसंबून राहतात. हाव किंवा भीती यामुळे ते चुकीचे निर्णय घेतात. एकाच शेअरमध्ये जादा व्यवहार करतात. त्यामुळे त्यांना पुरेसा फायदा मिळत नाही, असे सॅमकोचे सीईओ व संस्थापक जिमित मोदी म्हणाले. निर्देशांकांपेक्षा जास्त फायदा मिळवायची संस्कृती गुंतवणूकदारांमध्ये रुजणे जरुरी आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनीही जनजागृती करावी, असेही ते म्हणाले.

त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून, गुंतवणुकीच्या संधींचे विश्लेषण करून आपले व्यवहार करावेत व बाजार निर्देशांकांपेक्षा जास्त परतावा मिळवावा, अशी ‘एस द इंडेक्स’ ही योजना सॅमकोने आणली आहे. यात त्यांच्या ॲपमार्फत गुंतवणूकदारांना माहिती देऊन सर्व साह्य व मार्गदर्शन केले जाते; अन्यथा गुंतवणूकदारांनी आपले पैसे अनुभवी फंड मॅनेजरमार्फत गुंतवावेत किंवा इंडेक्स इटीएफमध्ये गुंतवावेत म्हणजे त्यांना पुरेसा फायदा होईल, असेही मोदी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com