मुंबईच्या पालिकेच्या आरोग्य सेविकांसाठी तपासण्या, पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनचा पुढाकार

मुंबईच्या पालिकेच्या आरोग्य सेविकांसाठी तपासण्या, पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनचा पुढाकार

पालिकेच्या आरोग्य
सेविकांसाठी शिबिर
मुंबई, ता. १९ : पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनतर्फे पालिकेच्या आरोग्य सेविकांसाठी रविवारी विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुंबईचे आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य सेविका अनेक सुविधांपासून वंचित असतात. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य सेविकांसाठी शिबिर घेण्यात आले. शिबिरात मालाड आणि इतर परिसरातील एकूण ८० आरोग्य सेविका सहभागी झाल्या. आरोग्य सेविकांचे वजन, डोळे, उंची, बीएमआय, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी व स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला असे शिबिराचे स्वरूप होते. शनिमहात्मा हेल्थकेअर केंद्र आणि पालिकेच्या आरोग्य सेविकांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य सेविकांच्या मागणीनुसार त्यांच्यासाठी मोफत शिबिर घेण्यात आले. एसआरव्ही रुग्णालयाचाही त्यासाठी पुढाकार मिळाला, असे पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनच्या अध्यक्ष नयना कनाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com