प्राध्यापकांची पदे भरण्यास 
वित्त विभागाची मान्यता ः पाटील

प्राध्यापकांची पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता ः पाटील

मुंबई, ता. २० : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन प्राचार्य, सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. वित्त विभागाने दोन हजार ८८ सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल केले आहे. तसेच १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपालांची १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालकांची १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com