अनिल परब यांना गुरुवारपर्यंत दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परब यांना
गुरुवारपर्यंत दिलासा
अनिल परब यांना गुरुवारपर्यंत दिलासा

अनिल परब यांना गुरुवारपर्यंत दिलासा

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : मुंबई उच्च न्यायालयाने आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते अनिल परब यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. २३) संरक्षण दिले आहे. तोपर्यंत परब यांच्यावर अटकेची कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले.
न्यायालयाने परब यांना आजपर्यंत दिलासा दिला होता; मात्र आज नियमीत खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला. परब यांच्या वतीने आणखी काही दिवस संरक्षण अवधी देण्याची मागणी ॲड. अमित देसाई यांनी केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी तोंडी हा अवधी गुरुवारपर्यंत मान्य केला. परब यांचे व्यावसायिक भागीदार असलेले सदानंद कदम यांना ईडीने नुकतीच अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि ईडीचा ‘ईसीआयआर’ अहवाल रद्दबातल करण्यासाठी याचिका केली आहे. माझा या प्ररकरणात सहभाग नाही; मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या वारंवार आरोप करत आहेत, असा दावा परब यांनी केला आहे.